जोडीदार
खर तर हा blog मी आमच्या लग्नाच्या ८ व्या anniversary (३० नोव्हेंबर) ची आठवण म्हणून लिहिला होता पण न राहवून आजच publish करतीये. त्यामुळे anniversary ला काहीतरी वेगळं plan करावं लागेल इतकंच.. असो ..
लहानपणीपासून प्रत्येक मुलामुलीची आपल्या जोडीदाराबद्दल काही स्वप्न असतात. चित्रपटसृष्टीचा आपल्या समाजावर इतका जास्त प्रभाव आहे कि हि स्वप्न बऱ्याचदा दिसण्यापुरती किंवा बाह्य सौन्दर्यापुरतीच मर्यादित राहतात. पण खर तर दिसणं आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काहीएक संबंध नसतो. Reel लाईफमध्ये पडद्यावरती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या real लाईफमधल्या जोडीदारांकडे पाहूनही हे लक्षात येईल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत पण मराठमोळी निवेदिता आणि अशोक सराफ हि माझ्या आवडत्या जोड्यांपैकी एक. तर पडद्यावरची "सैराट" सारखी गोष्ट आपण REAL लाईफमध्येही बऱ्याचदा पाहतो पण REAL लाईफमध्ये ती इतकी सुखकारक नाही दिसत कारण REEL आणि REAL ह्यामध्ये फरक आहे. त्यामुळे "सैराट" फक्त पडद्यावर ३ तास मनोरंजन म्हणून ठीक वाटतो. असो...
लग्न जमवताना मुलामुलीचे किती गुण जुळतायत हे पाहिलं जातं, पंचांगानुसार तर माहित नाही पण रिअल लाईफमध्ये माझे आणि माझ्या जोडीदाराचे एकही गुण जुळत नाहीत. "Opposite Attracts " (used to say that people who are very different from each other are often attracted to each other) हा नियम जणू आमच्याचसाठी बनला असावा. उदाहरणचं द्यायचं झालं तर - तो South मी West , तो कन्नड मी मराठी , तो काळा मी गोरी , तो fit मी fat , तो दूध मी चहा , तो इडली सांबर मी वरण भात , तो convent चा student जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी मी , fluent English बोलणारा तो अजूनही धडपडणारी मी , स्वयंपाक घरात रमणारी मी किचनमधे enter हि न करणारा तो , आकाशात उडणारी मी जमीन न सोडणारा तो आणि अशा कितीतरी गोष्टी .. पण ह्या गोष्टींकडे साकारसात्मक दृष्टीने पाहिलं तर आमच्यातील भिन्नतेमुळे आम्ही एकमेकांना complete करतो कारण ज्या गोष्टी मला जमत नाहीत त्या त्याला जमतात आणि त्याला जे येत नाही तिथे मी असते.
"नशीब" ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता खरं तर माझा पण तुझ्या येण्याने विश्वास बसला माझा त्यावर. "प्रेम" ह्या शब्दाची भरकटलेली व्याख्या acceptance, respect , care आणि trust सारख्या शब्दांवरती येऊन थांबली. ८ वर्षांच्या आपल्या संसारात तू मला नवरा, guide , mentor , मित्र , प्रियकर अश्या प्रत्येक रूपात साथ दिलीस. असं म्हणतात, साधारणतः माणूस ४५ “DEL” (unit) of pain च्या वेदना सहन करू शकतो पण स्त्री गरोदरपणात ५७ “DEL” (unit) च्या वेदना सहन करत असते. आपल्या शरीरातील २० हाडं एकाचवेळी fracture झाल्यावर ज्या वेदना होतील त्या वेदना बाई बाळाला जन्म देताना सहन करत असते. अगदी त्यावेळीही माझी आई बनलास तू, तुझ्या हातात हात देऊन ती न विसरणारी रात्र पण पार केली आपण. "पुरुषयांपेक्षा स्त्री मला कायमच जास्त कणखर वाटते. कितीतरी असह्य प्रसंग पेलवून नेण्याची ताकद असते तिच्यात !! दडपण आलं म्हणून स्त्री व्यसनाधीन होत नसते , हे त्याचच उदाहरण .. सगळ दुःख पचवून चेहरा हसरा ठेवण्याचे सामर्थ्य असते तिच्यात !!". असो ..
इतर सर्व मुलींप्रमाणे मलाही मेकअप करायला फार आवडतं पण फॉउंडेशन, पावडर , लिपस्टिक आणि काजळापेक्षा तू दिलेल्या आत्मविश्वास , समाधान , आनंद आणि smile सारख्या कॉन्स्मेटिकसनीच चेहरा जास्त चमकतो माझा. चाखोरीतलं जगण कधी जमलं नाही मला पण तू ही कधीच चाखोरी नाही आखली माझ्यासाठी. माणूस जेंव्हा यशस्वी होतो तेंव्हा सगळेच साथ देतात पण तू त्या लिस्टमध्ये आहेस ज्यांनी मला सर्व परीस्थित साथ दिली.
Thank You, माझी चूक असतानाहि सर्वांसमोर मला दिलेल्या साथीसाठी (अर्थात नंतर ओरडा मिळतोच 😡). तू यशस्वी तर आहेसच पण येत्या भविष्यात उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा.
तुझीच Beautiful.
मंजुश्री खटकाळे जाधव
(NOTHING IS POSSIBLE WITHOUT YOUR WISH विघ्नहर्ता )
Comments
Post a Comment