जोडीदार
खर तर हा blog मी आमच्या लग्नाच्या ८ व्या anniversary (३० नोव्हेंबर) ची आठवण म्हणून लिहिला होता पण न राहवून आजच publish करतीये. त्यामुळे anniversary ला काहीतरी वेगळं plan करावं लागेल इतकंच.. असो .. लहानपणीपासून प्रत्येक मुलामुलीची आपल्या जोडीदाराबद्दल काही स्वप्न असतात. चित्रपटसृष्टीचा आपल्या समाजावर इतका जास्त प्रभाव आहे कि हि स्वप्न बऱ्याचदा दिसण्यापुरती किंवा बाह्य सौन्दर्यापुरतीच मर्यादित राहतात. पण खर तर दिसणं आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काहीएक संबंध नसतो. Reel लाईफमध्ये पडद्यावरती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या real लाईफमधल्या जोडीदारांकडे पाहूनही हे लक्षात येईल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत पण मराठमोळी निवेदिता आणि अशोक सराफ हि माझ्या आवडत्या जोड्यांपैकी एक. तर पडद्यावरची "सैराट" सारखी गोष्ट आपण REAL लाईफमध्येही बऱ्याचदा पाहतो पण REAL लाईफमध्ये ती इतकी सुखकारक नाही दिसत कारण REEL आणि REAL ह्यामध्ये फरक आहे. त्यामुळे "सैराट" फक्त पडद्यावर ३ तास मनोरंजन म्हणून ठीक वाटतो. असो... लग्न जमवताना मुलामुलीचे किती गुण ज...